लहानग्या शौर्याचा मोठा पराक्रम; नवोदय परीक्षेत घवघवीत यश.....
जामनेर तालुक्यातून एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बातमी समोर आली असून, कुमारी शौर्या संदीप निकम हिने नवोदय प्रवेश परीक्षेत दणदणीत यश संपादन करत संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान वयात मोठे स्वप्न पाहून ते साकार करण्याची ताकद काय असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे शौर्या Lord Ganesha English School Jamner येथील इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारी शौर्या ही अभ्यासात सातत्य, जिद्द आणि मेहनत यांची उत्तम सांगड घालत यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शौर्या ही ग्रामपंचायत अधिकारी संदीप चंद्रभान निकम व बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पंचशीला संदीप निकम यांची कन्या असून, घरातील शैक्षणिक वातावरण, संस्कार आणि पालकांचे पाठबळ हे तिच्या यशाचे खरे आधारस्तंभ ठरले आहेत.
या यशामागे Dhaval Classes Jamner येथील रमाकांत पाटील सर यांचे अचूक मार्गदर्शन आणि मेहनतीचा मोठा वाटा आहे. योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण सरावामुळे शौर्याने नवोदय परीक्षेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा