महाराष्ट्र
अंत्रोळी जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना दाद...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (अंत्रोळी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथील वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त क्रीडा अधिकारी व राष्ट्रीय खो-खो मार्गदर्शक सत्यम जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गुप्तहेर पोलीस खात्याचे सिराज मुलानी उपस्थित होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे, नामदेव सुपेकर, सदस्य सिद्धनाथ माने, सरपंच ब्रह्मदेव सलगरे, उपसरपंच सोनाली खरात, ज्येष्ठ नागरिक मजनुद्दीन पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी आयुब कलबुर्गी, सैपन आळगी, केंद्रप्रमुख आमसिद्ध म्हेत्रे, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजीव चाफा करंडे, मुख्याध्यापक श्रीरंग बनसोडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वागत गीत, देशभक्तीपर गीत, गोंधळ, लावणी, लेझीम, सिनेगीते, बंजारा नृत्य, बालगीते, विनोदी नाटिका, कव्वाली तसेच दैवत छत्रपती व भीमगीते अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीरंग बनसोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नागनाथ म्हमाने यांनी मानले. यावेळी प्रत्येक वर्गातील आदर्श विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉद्वारे साडी व भिंतीवरील घड्याळ भेट देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा