महाराष्ट्र
अंत्रोळी प्रीमियर लीगची धूम ; टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची जोरदार तयारी!
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (अंत्रोळी) : क्रीडाप्रेमींसाठी आकर्षण ठरणारी अंत्रोळी प्रीमियर लीग (APL) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. कै. वसंतराव (बाबा) आपटे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडत असून गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
दि. २ एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी परिसरातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ₹२०,५५५, द्वितीय ₹१५,५५५, तृतीय ₹११,५५५ व चतुर्थ ₹५,५५५ अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांसह विविध वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ₹११५० निश्चित करण्यात आली असून अंतिम सामन्यातील मानकरी व उत्कृष्ट खेळाडूंना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा अंत्रोळी व पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी याच्यां सहकार्यातून पार पडणार असून पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. खेळाडूंनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दादा शिंदे, आप्पू कोळी, श्रीकांत कोकरे, सागर थोरात, विजय कोळी, विशाल बंडगर आदी सदस्य परिश्रम घेत आहेत.
व तसेच जितेंद्र थोरात, सर्जेराव शिंदे, बिरू शिंदे, अशोक हजारे, डॉ. विलास भालगावकर (सर), राम कोळी, सिद्धू माने आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या स्पर्धेत पंचक्रोशीतील जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा