कोरवलीत श्री अमोगसिद्ध यात्रा महोत्सवाचा जल्लोष ; पालखी भेटीचा सुवर्ण सोहळा ‘या’ दिवशी थाटात होणार! - दैनिक शिवस्वराज्य

कोरवलीत श्री अमोगसिद्ध यात्रा महोत्सवाचा जल्लोष ; पालखी भेटीचा सुवर्ण सोहळा ‘या’ दिवशी थाटात होणार!


समीर शेख, प्रतिनिधी
मोहोळ (कोरवली) : कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील ग्रामदैवत श्री अमोगसिद्ध यांच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेला यात्रा महोत्सव व पालखी भेटीचा सुवर्ण सोहळा यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. गावात सर्वत्र धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत.
    यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकड आरती, अभिषेक व महापूजा होणार असून दिवसभर भजन-कीर्तन व धार्मिक प्रवचनांनी परिसर दुमदुमून जाणार आहे. विविध गावांमधून येणाऱ्या पालख्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून पालखी भेटीचा सोहळा हा यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.
       यावेळी श्री अमोगसिद्ध अन्नछत्र मंडळातर्फे भाविकांसाठी दोन दिवस मोफत जेवण व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो भाविकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून “श्रीवरजी मलकारसिद्ध” नाटक सादर करण्यात येणार आहे.
    ग्रामपंचायत, यात्रा समिती व सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीपणे पार पडणार असून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
   यात्रा समितीचे अध्यक्ष संतोष यशवंत म्हमाणे यांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
   भक्ती, परंपरा आणि एकोप्याचा संगम घडवणारा हा यात्रा महोत्सव कोरवली गावाच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा ठरणार आहे. 
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads