जामनेरातील स्व. प्रशांत वाघ मृत्यू प्रकरणी कुटुंबियांची मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरातील स्व. प्रशांत वाघ मृत्यू प्रकरणी कुटुंबियांची मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव जिल्ह्यातील स्व. प्रशांत दिलीप वाघ यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.
या वेळी कुटुंबीयांनी संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देत, या प्रकरणात गंभीर दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. विशेषतः, गुन्हा नोंदविण्यास तब्बल १३ दिवस उशीर का झाला? असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच “मिटवून घ्या” असे सांगण्यामागचा नेमका उद्देश काय होता? असा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट इशारा दिला की,
या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही.असे त्यांनी स्पष्ट केले.जर ही घटना त्यांच्या स्वतःच्या मुलासोबत घडली असती, तर त्यांनी काय केलं असत? असा थेट सवाल करत, या आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे म्हणजे आरोपीला मोकाट फिरण्यासाठी गुन्हा नोंद केला का ? स्व.प्रशांत वाघ आत्महत्या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, स्व. प्रशांत वाघ यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते स्वतः या प्रकरणात विशेष लक्ष घालणार आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्याशी थेट संपर्क साधून, योग्य दिशेने चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.जर या प्रकरणात न्याय मिळण्यात कोणतीही दिरंगाई झाली किंवा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads