महिला दिनी सोलापूर मनपाच्या महिला वाहकांचा सन्मान; ‘शिवकृपा’ कंपनीचा स्तुत्य उपक्रम... - दैनिक शिवस्वराज्य

महिला दिनी सोलापूर मनपाच्या महिला वाहकांचा सन्मान; ‘शिवकृपा’ कंपनीचा स्तुत्य उपक्रम...


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील महिला वाहकांनी गेल्या अनेक वर्षांपासून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारीने सेवा बजावत प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या कष्टाचे आणि योगदानाचे कौतुक करण्यासाठी महिला दिनानिमित्त सात रस्ता बस डेपो येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
      कोल्हापूर येथील शिवकृपा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांना साडी, मानाचा फेटा, हार, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पेढे भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन विभागाचे मुख्य नियंत्रण अधिकारी व्यंकटेश गुडशेलू होते. यावेळी प्रभारी वाहतूक निरीक्षक सतीश गुंड, सेवा मदतनीस शहाजी भोजने, वाहतूक निरीक्षक अंकुश बोराडे तसेच शिवकृपा प्रायव्हेट लिमिटेडचे सहाय्यक रवि काकडे उपस्थित होते.
“महिला वाहक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यांचा हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेणारी पावती आहे,” असे मत यावेळी व्यंकटेश गुडशेलू यांनी व्यक्त केले.
सत्कारार्थी महिला कर्मचारी:
सुजाता बिराजदार, रुपा कल्याणशेट्टी, मनिषा बदलापूरे, सुप्रिया बिराजदार, राजनंदिनी गायकवाड, नागुबाई जनगे, लक्ष्मी तळभंडारे, जयश्री होनपारखे, शिल्पा चितळी, निर्मला बिराजदार, विजयालक्ष्मी झळके, वैशाली कवडे आणि सविता हिंगणकर या महिला वाहकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
    परिवहन उपक्रमातील कर्मचारी वर्गाच्या उत्साही उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads