महाराष्ट्र
मंद्रूप पोलिसांची दमदार कारवाई ; सिने-स्टाईल पाठलाग करून 2 आरोपी जेरबंद...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत 24 एप्रिल रोजी रात्री घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 6 तासांत उलगडा करत मंद्रूप पोलिसांनी धडाकेबाज आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
फिर्यादी आयशर टेम्पोमधून मालवाहतूक करत असताना मलसिद्धप्पा मंदिर परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांचा टेम्पो अडवून जबरदस्तीने वाहन थांबवले. त्यानंतर फिर्यादीस मारहाण करून अंदाजे ₹20,000 रोख रक्कम हिसकावून नेण्यात आली.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तपास पथकाला तातडीने सूचना दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सहायक फौजदार बापू शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल माजिद शेख, संदीप काळे आणि चालक श्रीशैल शिवणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने सिने-स्टाईल पाठलाग करत दोन आरोपींना जेरबंद केले, तर तिसऱ्या आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. अटक आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पो. उपनिरीक्षक राज डांगे करत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या 6 तासांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना ताब्यात घेण्याची ही धडाकेबाज कामगिरी मंद्रूप पोलिसांनी बजावली असून यामुळे परिसरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आरोपींची ओळख परेड होणे बाकी असल्याने त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा