कळमसरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम; महिला कर्तृत्वाचा गौरव, मान्यवरांची उपस्थिती आणि भीमगीतांनी रंगला सोहळा - दैनिक शिवस्वराज्य

कळमसरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम; महिला कर्तृत्वाचा गौरव, मान्यवरांची उपस्थिती आणि भीमगीतांनी रंगला सोहळा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
कळमसरा (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. "सन्मान स्त्री कर्तृत्वाचा तसेच भीमगीतांचा कार्यक्रम" या अनोख्या उपक्रमामुळे हा सोहळा विशेष ठरला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. गिरीश भाऊ महाजन (कॅबिनेट मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन) व मा. सौ. साधनाताई महाजन (नगराध्यक्ष, जामनेर) उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रशांत दादा भोंडे (उपनगराध्यक्ष, जामनेर), सौ. उज्वला ताई दीपक तायडे (नगरसेविका), श्री दीपक तायडे (स्वीय सहाय्यक), मा. श्री संजीवजी निकम (राज्याध्यक्ष, ग्रामपंचायत अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य), श्री अनिल कौतिक गायकवाड पाटील (संचालक, जळगाव), श्री कैलास अप्पा चौधरी (माजी उपसभापती, पाचोरा), श्री दीपक भगवान शिंदे (विस्ताराधिकारी, पंचायत समिती पाचोरा), श्री संजय भाऊ मधुकर उशीर (माजी सरपंच, कळमसरा), आयुष्यमान राकेशजी अशोक खरे (भोपाल), सौ. रत्नाताई संजय चौधरी (सरपंच, कळमसरा), श्री कैलास भाऊ नरवाडे (नगरसेवक, जामनेर), श्री रतन रामदास बावस्कर (माजी सभापती, पाचोरा), श्री गोविंदा ओंकार निकम (माजी चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी), श्री बापू निकम (ग्रामपंचायत सदस्य), प्रा. गौतम उत्तम निकम, प्रा. शांताराम बाबुराव पवार (जामनेर), श्री रमेश नामदेव ब्राह्मणे (पाचोरा), श्री डी. जी. वाघ (पाचोरा), श्री के. एल. भुसांडे (लोहारा), तसेच श्री सुनील कडुबा निकम (माजी ग्रामपंचायत सदस्य) यांची उपस्थिती होती.
भीमगीतांच्या कार्यक्रमात गायिका दिपाली इंगळे, गायक अण्णा सुरवाडे, गायक शांताराम निकम, गायक आकाश शिंदे व गायिका स्पर्शिका संदीप निकम यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विधी संचालन प्रा. डॉ. प्रमोद चंद्रभान निकम यांनी केले, तर प्रबोधनपर व्याख्यान प्रा. अविनाश आत्माराम निकम यांनी दिले. सूत्रसंचालन आयुष्यमान संदीप चंद्रभान निकम (ग्राम विकास अधिकारी) व आयुष्यमानी पंचशीला संदीप निकम (कार्यकारी सहाय्यक, बीएमसी) यांनी केले.
विशेष उपस्थिती म्हणून आयुष्यमान वसंत दादा लोखंडे (जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), आयुष्यमान सुशीलकुमार हिवाळे (जिल्हा सरचिटणीस), आयुष्यमान चंद्रकांत मन्साराम इंगळे (तालुका अध्यक्ष, जामनेर शाखा) तसेच समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महिला सन्मानाचा अनोखा उपक्रम:
या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला. विशेषतः पंचशीला संदीप निकम (बीएमसी, मुंबई येथे कार्यकारी सहाय्यक पदावर निवड) यांचा कळमसरा ग्रामस्थ व महिला मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी सौ. रत्नाताई चौधरी, सौ. सविता ताई विनोद निकम (सरपंच), अक्काताई धायतडक (माजी जयंती उत्सव समिती अध्यक्षा), सुनिता चंद्रभान निकम यांनी विशेष कौतुक केले.
तसेच आरोग्य विभागातील सौ. ज्योती पवन निकम (आरोग्य पर्यवेक्षिका), अक्काताई धायतळ (प्राथमिक आरोग्य केंद्र), सौ. सविता विनोद निकम (माजी सरपंच) यांचा सत्कार झाला. नवोदय परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या शौर्या संदीप निकम हिचाही गौरव करण्यात आला.
याशिवाय, पीएचडी प्राप्त केल्याबद्दल प्रा. डॉ. प्रमोद चंद्रभान निकम (व्हॉइस प्रिन्सिपल, पीईएस कॉलेज, औरंगाबाद) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करणारे सहकारी:
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय सुखदेव सुरवाडे, गोविंदा ओंकार निकम, बापू निकम, विजय महेंद्र निकम, राजू गोविंदा निकम, विनोद देवचंद निकम (माजी सरपंच), माधव पंडित पाटील, ज्ञानेश्वर भागवत निकम, दीपक ज्ञानेश्वर पवार, बंटी जिरे, नारायण पंडित पाटील, गोकुळ चिंतामण वाघ, उत्तम एकनाथ निकम, श्याम एकनाथ निकम, संदीप उत्तम निकम, प्रदीप गांगुर्डे, प्रमोद महेंद्र निकम, विशाल विजय सुरवाडे, जीवन भगवान निकम, सतीश भास्कर निकम, अनिल भीमराव निकम, समाधान देवचंद शिरसाट, बाबुराव ईश्वर निकम, विनोद उखा वानखेडे, सुभाष सुखदेव निकम यांनी परिश्रम घेतले.महिला मंडळातील अक्काताई धायतड, सविता विनोद निकम, स्वाती प्रमोद निकम, प्रभावती जोगदंडे, वैशाली शिरसाट, कविता दगाजी निकम, वैशाली बापू निकम, सुनिता चंद्रभान निकम, सुजाता प्रशांत निकम, साक्षी प्रशांत निकम, सुमनबाई महेंद्र निकम, कमलबाई महेंद्र निकम यांचेही विशेष योगदान होते.तसेच कळमसरा येथील भीम टायगर ग्रुप व प्लॉट मित्रपरिवार यांनीही मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे आयोजन आयुष्यमान चंद्रभान ओंकार निकम, प्रा. डॉ. प्रमोद चंद्रभान निकम व आयुष्यमान संदीप चंद्रभान निकम (ग्राम विकास अधिकारी) यांनी केले होते. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.हा कार्यक्रम सामाजिक एकता, स्त्री सक्षमीकरण आणि प्रेरणादायी विचारांचा संगम ठरला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads