अखेर वाकडी आरोग्य केंद्र येथील वाहन चालक निलंबित - दैनिक शिवस्वराज्य

अखेर वाकडी आरोग्य केंद्र येथील वाहन चालक निलंबित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर तालुक्यातील वाकडी आरोग्य केंद्र येथील शासकीय वाहनाचा वाहन चालक मागील आठवड्यात अत्यंत मध्य धुंद अवस्थेत व संशयास्पद स्थितीत असल्याचे जाणवल्याने नागरिकांनी सदर वाहन चालकास थांबून जाब विचारला तेव्हा संबंधित वाहनचालक पूर्णपणे नशेत असल्याचे त्याला साधे बोलता येत नसल्याचे व्हिडिओ व न्यूज द्वारे चित्रीकरण समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते तसेच यासंदर्भात तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या होत्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी सदर प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर वाहन चालक, तसेच सदर घटनेची व मागील तक्रारींची चौकशी करण्यात आली.
चौकशीमध्ये व्हिडिओ व चित्रफित सत्यता असल्याचे निदर्शनात आले तसेच यापूर्वी सुद्धा सदर वाहन चालकाबाबत काही नागरिकांनी दोन वेळा तोंडी तक्रारी केले असल्याचे समजले. उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे सुद्धा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
चौकशी अधिकारी यांनी विहित वेळ देऊन सुद्धा सदर वाहन चालकाने कोणत्या प्रकारच्या खुलासा केला नाही चौकशी अहवाल व वस्तुनिष्ठ परिस्थितीच्या आधारे वरिष्ठ कार्यालयाकडून सदर वाहन चालकास निलंबित करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्याकडून देण्यात आली. तसेच सदर वाहन चालकाचा योग्य त्या कारवाई साठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली. 
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads