महाराष्ट्र
खो-खो क्षेत्रात अंत्रोळीचा झेंडा ; राज्य खो-खो निवड समितीवर श्रीरंग बनसोडे यांची महत्त्वपूर्ण निवड
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : कुमठे गावचा अभिमान आणि जि. प. शाळा अंत्रोळी येथील कर्तृत्ववान शिक्षक श्रीरंग बनसोडे यांची सन 2026-27 या कालावधीतील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी होणाऱ्या कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पुणे येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
खो-खो क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय असलेले बनसोडे हे सोलापूर खो-खो असोसिएशनचे खजिनदार तसेच राष्ट्रीय पंच म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत. याशिवाय कास्ट्राईब शिक्षक संघटना (दक्षिण सोलापूर) शाखेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक कामात आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
त्यांच्या या यशस्वी निवडीमुळे कुमठे व अंत्रोळी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, उपाध्यक्ष महेश गादेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके, आयुब कलबुर्गी, कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीशैल कोरे, मुख्याध्यापक युवराज राठोड तसेच शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, पालक व सोलापूर खो-खो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा