महाराष्ट्र
जि. प. शाळा अंत्रोळी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..
समीर शेख, प्रतिनिधी
अंत्रोळी : जि. प. शाळा अंत्रोळी येथे विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव, परमपूज्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षक श्रीरंग बनसोडे सर व कीर्ती जाधव मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या कार्याचा गुणगौरव व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. भीमगीते, नृत्यविष्कार यांसारख्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड, श्रीरंग बनसोडे, नागनाथ म्हमाने, कीर्ती जाधव, मीनाक्षी राठोड, पुष्पा बनसोडे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ अंत्रोळीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे, सदस्य विक्रम जाधव, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ म्हमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन मीनाक्षी राठोड यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा