महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी अंत्रोळी सज्ज ; नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (अंत्रोळी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंत्रोळी येथे भव्य उत्सव साजरा करण्यासाठी आयोजित बैठकीत उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत ग्रामस्थांच्या उपस्थितीत एकमताने पुढीलप्रमाणे पदाधिकारी जाहीर करण्यात आले.
अध्यक्षपदी सागर कांबळे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी विजय सुखदेव कांबळे यांची निवड झाली आहे. खजिनदार म्हणून युवराज कांबळे, तर सहखजिनदार म्हणून विकी गोपाळ कांबळे यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सचिवपदी राजू धो. कांबळे यांची निवड झाली असून, सहसचिव म्हणून अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून मारुती बाबाजी कांबळे, आनंदा कांबळे व अनिल तुर्भे यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून काशिनाथ कांबळे, विजय जायप्पा कांबळे, करण गौतम कांबळे व कुंभकरण कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. विविध सांस्कृतिक, सामाजिक व मिरवणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा