जळगावात उष्माघात प्रतिबंधासाठी मोफत होमिओपॅथिक औषध वितरण शिबिराचा शुभारंभ - दैनिक शिवस्वराज्य

जळगावात उष्माघात प्रतिबंधासाठी मोफत होमिओपॅथिक औषध वितरण शिबिराचा शुभारंभ

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने जळगाव येथे उष्माघात प्रतिबंधासाठी मोफत होमिओपॅथिक औषध वितरण शिबिराला उत्साहात सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनांतर्गत शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने तसेच मा. आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या सहकार्याने स्टेडियम चौक येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात नागरिकांना प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषधे मोफत देण्यात येत असून, तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक मार्गदर्शनही केले जात आहे.
अधिष्ठाता डॉ. पराग भागवत यांनी सांगितले की, “उन्हाळ्यात उष्माघात हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनत आहे. योग्य प्रतिबंधक उपाययोजना आणि होमिओपॅथिक औषधोपचार यांच्या मदतीने उष्णतेचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो.”
मा. आमदार श्री. राजूमामा भोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गंभीर आजार टाळता येऊ शकतात.”
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रितेश पाटील, डॉ. सुनील पाटील, डॉ. भूषण जैन, डॉ. अमर पंजाबी, डॉ. पुष्कर महाजन, डॉ. निलेश पाटील, डॉ. अजित विसपुते, डॉ. अभिजीत मुरळ, डॉ. पंकज लोणगडगे, डॉ. सतीश पाटील, डॉ. तुषार पाटील, डॉ. अमर मराठे, डॉ. मनोज विसपुते, डॉ. केयूर चौधरी, डॉ. योगेश सरताळे, डॉ. रुपाली रींधे, डॉ. मिनल महाजन, डॉ. भैरवी जाधव, डॉ. प्रतीक्षा पाटील, डॉ. अर्चना काबरा, डॉ. ज्योती हिराणी, डॉ. कल्पना भुंबरे आणि डॉ. दीपाली लोढा यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
१ ते ५ मे या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दररोज मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून औषधांचा लाभ घेत आहेत.
शिबिराची वेळ सकाळी १० ते दुपारी २ व संध्याकाळी ५ ते रात्री ८ अशी आहे. स्टेडियम चौक येथे सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads