सोनबर्डीतील तरण तलावात हृदयद्रावक घटना — ७ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू, जामनेर परिसरात शोककळा - दैनिक शिवस्वराज्य

सोनबर्डीतील तरण तलावात हृदयद्रावक घटना — ७ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू, जामनेर परिसरात शोककळा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर, दि. ४ मे २०२६ जामनेर शहरातील सोनबर्डी परिसरात एका तरण तलावात घडलेल्या दुर्दैवी अपघातात अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक गणेश पाटील (वय ७) हा मूळचा एकुलती येथील रहिवासी असून सध्या तो आपल्या कुटुंबासह जामनेर शहरातील दर्शन पार्क परिसरात राहत होता. रविवारी (दि. ३ मे) सायंकाळी तो कुटुंबासोबत सोनबर्डी येथील तरण तलावावर गेला होता.
पोहणे आटोपल्यानंतर कार्तिकच्या वडिलांनी त्याला तलावाजवळील चेंबरजवळ उभे करून कपडे आणण्यासाठी गेले. याच दरम्यान काही क्षणांतच कार्तिकचा तोल जाऊन तो चेंबरमध्ये पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाल्याने कार्तिकचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या दुर्दैवी घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सावधगिरीचा इशारा.....
तरण तलाव किंवा जलतरण स्थळी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads