महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेचा शंभर टक्के निकाल ; विद्यार्थ्यांचा सत्कार
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेतील माध्यमिक शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. प्रशालेचा यंदा शंभर टक्के निकाल लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू गायकवाड व प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव यादव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विष्णू गायकवाड व महादेव यादव यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रवी देवकर यांनी तर आभार किरण गायकवाड यांनी मानले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा