अंत्रोळीतील उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचा समारोप; राज्य-राष्ट्रीय स्तर गाठण्याचे खेळाडूंना मार्गदर्शन... - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळीतील उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचा समारोप; राज्य-राष्ट्रीय स्तर गाठण्याचे खेळाडूंना मार्गदर्शन...


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) : शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूर यांच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा अंत्रोळी येथे २१ मेपासून आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. किशोर व किशोरी गटातील खेळाडूंसाठी आयोजित या विशेष प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना खो-खो खेळातील विविध कौशल्ये, शिस्त, संघभावना आणि खिलाडू वृत्तीचे प्रशिक्षण देण्यात आले.
      समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन पंच मंडळाचे माजी सचिव तसेच सोलापूर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक तरुण भारतचे उपसंपादक, सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख अजितकुमार संगवे उपस्थित होते.
यावेळी शाहू स्पोर्ट्सचे सचिव व राष्ट्रीय खो-खो पंच श्रीरंग बनसोडे, खजिनदार नागनाथ म्हमाने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे, पालक सलीम शेख, शशिकांत कोळी तसेच अंत्रोळी गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    अध्यक्षीय भाषणात श्रीकांत ढेपे यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, चिकाटी आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत, “अंत्रोळी गावातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन केले.
   यावेळी राज्यस्तरीय खेळाडू गौरी शिंगण आणि प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक सदानंद गुजले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरंग बनसोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन नागनाथ म्हमाने यांनी केले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads