महाराष्ट्र
मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?
दैनिक शिवस्वराज्य वृत्तसेवा: प्रतिनिधी सलीम पटेल
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. यावेळी रणरणत्या उन्हामध्ये मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये एक दिवशीय उपोषण केलं. अखेरीस शनिवारी रात्री उशिरा शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली.राज्य सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहे. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये एक दिवशी रणरणत्या उन्हामध्ये उपोषण केलं. जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी दिवसभर सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. अखेरीस रात्री उशिरा सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्या अभ्यासकांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जरांगेंनी आंदोलकांशी संवाद साधला.
मनोज जरांगेंनी दिली माहिती
आपल्याकडे सगळे अभ्यासक आहे. आपण त्यांना मागण्या केल्या होत्या, त्यावर त्यांनी मसुदा तयार केला आहे. कुणबीचा दस्तावेज दिला आहे. ते देण्याचं मान्य केलं आहे. ५८ लाख कुणबी नोंदी देण्याची मान्य केलं आहे.४९ लाख कुणबी नोंदी दिल्या आहे, आता ५८ लाख कुणबी नोंदी देण्याचं सरकार मान्य केलं आहे. विभागीय आयुक्त यासाठी काम करणार आहे. हा दस्तावेज आपल्याकडे येणार आहे, हे महत्त्वाचं आहे.दुसरं म्हणजे, हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जर अधिकाऱ्यांनी कुणबी नोंदी देण्यास नकार दिला तर निलंबनाची कारवाई होईल. मराठा आणि कुणबीसाठी स्वतंत्र्य मंत्रालय स्थापन केले जाणार आहे. जिथे सुचना अधिकारी असणार आाहे.स्वतंत्र्य कक्ष असणार आहे. सरकारने बाकी सुचनासाठी आदेश दिले आहे. सगळ्या मागण्या या मान्य झाल्या आहेत. सातारा संस्थानच्या गॅझेटियरचा जीआर लगेच काढावा.मराठा आंदोलनाममध्ये बलिदान दिलेल्या मराठा बांधवाच्या कुटुंबीयांच्या वारसाला महावितरण आणि एमआयडीसीमध्ये नोकरी द्यावी. मराठा आंदोलनामध्ये तरुणांवर गुन्हे दाखल केले होते. ते गुन्हे मागे घेण्यात यावे. आम्हाला मारणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे. जातपडताळणी अभावी मराठा तरुणाचे शैक्षणिक प्रवेश थांबणार नाही.
राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्या मान्य केल्या आहे. त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी मराठा समाजासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारने मान्य केलेल्या मागण्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. २ ते ३ दिवसांमध्ये सुचना काढल्या जातील.
मनोज जरांगेंनी काय केल्या होत्या मागण्या?
– सर्व मराठा समाजाला 29 मेपूर्वी कुणबी प्रमाणपत्र द्या
– कुणबी प्रमाणपत्र दिलेल्यांना जात आणि वैधता प्रमाणपत्र द्या
– सरकारनं 1994 च्या धर्तीवर अध्यादेश काढावा
– मराठा उपसमिती बरखास्त करा
– मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्या
– आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना नोकऱ्या द्या
– सारथी संस्थेच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा
– महामंडळाच्या सर्व परताव्यांचं तात्काळ वाटप करा
– स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा