पंचायत समितीसमोर बेशिस्त पार्किंगवर धडक कारवाईगटविकास अधिकाऱ्यांचा अनोखा दंडुका; मोटारसायकलींची हवा सोडून दिला शिस्तीचा इशारा
जामनेर पंचायत समिती येथे बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने अनोखी आणि धडक कारवाई करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पंचायत समिती परिसरात नियमांचे उल्लंघन करून उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकलींवर थेट कारवाई करत स्वतः गटविकास अधिकाऱ्यांनी काही वाहनांच्या टायरमधील हवा काढून शिस्तीचा इशारा दिला.
कार्यालय परिसरात वारंवार होत असलेल्या अव्यवस्थित पार्किंगमुळे कर्मचारी, अधिकारी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत अनेकदा सूचना देऊनही काही वाहनधारक नियम पाळत नसल्याने अखेर प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागली.
या कारवाईनंतर पंचायत समिती परिसरात एकच चर्चा रंगली असून, “नियम सर्वांसाठी समान” असा संदेश प्रशासनाने दिल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. काहींनी या कृतीचे स्वागत करत “शिस्तीसाठी कठोर पावले आवश्यक” असल्याचे मत मांडले, तर काहींनी कारवाईची पद्धत चर्चेचा विषय ठरल्याचे सांगितले.
गटविकास अधिकाऱ्यांच्या या थेट कारवाईमुळे आता पंचायत समिती परिसरातील बेशिस्त पार्किंगला आळा बसणार हे नक्की
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा