माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून गुणवंतांचा गौरव ; कंदलगाव येथे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून गुणवंतांचा गौरव ; कंदलगाव येथे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न...


समीर शेख प्रतिनिधी 
कंदलगाव : शिक्षणातून समाज घडविण्याची परंपरा जपत जीवन ज्योत प्रशाला, कंदलगाव येथील सन १९९८-९९ च्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवारी (दि. २४) उत्साहात संपन्न झाला. दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रशाला सभागृहात आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी पाटील व बसवराज कोरे उपस्थित होते.
   या कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक व शिक्षकांचे योगदानही मान्यवरांनी अधोरेखित केले.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम, सातत्य व शिस्त यांच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवून उच्च ध्येय गाठावे, असे मतही व्यक्त करण्यात आले.
   कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा देखील रंगला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या सन १९९८-९९ च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा उपक्रम राबविल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
     यावेळी कपिल भडकुंबे व बसवराज कोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिनाथ कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुवर्णा पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads