महाराष्ट्र
बसस्थानकातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आ. राजू खरे यांचे आश्वाससन, काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी
मोहोळ : वृत्तसेवा प्रतिनिधी सलीम पटेल
मोहोळ बसस्थानकासमोरील महावितरणचे दोन पोल तात्काळ काढून घेण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या बसेसला पुरेशी जागा उपलब्ध होईल.त्याचबरोबर मोहोळ बसस्थानक सुसज्ज होत असताना ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले. बसस्थानकात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी आमदार राजू खरे यांनी केली. काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे आहे. त्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही अशा शब्दात कामाच्या गुणवत्तेबाबत ठेकेदाराला त्यांनी सूचना केल्या. नागरिकांना उत्तम व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी कामाची गती, गुणवत्ता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. आमदार फंडातून बसस्थानकात देण्यात आलेल्या आरो प्लांटचेही काम पूर्णत्वास गेले असून तोही लवकरात लवकर चालू करण्यात यावा अशा सूचना आ. खरे यांनी दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा