कुत्र्यांच्या हल्ल्यातून नीलगायीचे प्राण वाचले; शेतकऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
जामनेर, दि. 17 जून जामनेर तालुक्यातील शहापूर शेंगोळा शिवारात मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास एका नीलगायीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नीलगाय जखमी झाली होती. मात्र, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मदत केल्याने तिचे प्राण वाचले.मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या नीलगायीला गंभीर इजा होत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने धाव घेत कुत्र्यांना पळवून लावले व नीलगायीची सुटका केली. त्यानंतर जखमी नीलगायीला झाडाच्या सावलीत सुरक्षित ठिकाणी आणून तिची काळजी घेण्यात आली.
घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नीलगायीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील उपचार व आवश्यक कार्यवाहीसाठी तिला सुरक्षितरित्या हलविण्यात आले.वन्यजीवांप्रती संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांनी केलेल्या या कार्याचे परिसरात कौतुक होत असून, माणुसकी अजून जिवंत आहे" याची प्रचिती या घटनेतून आली आहे.
शहापूर शेंगोळा शिवारात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नीलगायीला शेतकरी व ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी आणून वनविभागाच्या ताब्यात दिले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा