“शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणार”; एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ... - दैनिक शिवस्वराज्य

“शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणार”; एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ...


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी सागर सिमेंट लिमिटेड आणि एम. के. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या एक लाख वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी विजापूर रोड येथील सागर सिमेंट कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
    शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार असून, उपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वह्या देऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
     यावेळी जनसेवक महादेव कोगनुरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या या सामाजिक बांधिलकीबाबत भावना व्यक्त करताना, "गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शक्य तेवढे योगदान देत राहणार असून समाजसेवेची ही ज्योत शेवटच्या श्वासापर्यंत तेवत ठेवण्याचा माझा निर्धार आहे," असे सांगितले.
     कोगनुरे यांनी यावेळी सागर सिमेंटचे मार्केटिंग हेड राजेश सिंग तसेच कंपनी व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आणि अधिकृत डीलर्स यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे कार्य शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
    कार्यक्रमास सागर सिमेंटचे अधिकृत डीलर्स, विविध क्षेत्रांतील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्व जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads