मंत्री मा.ना.गिरीष भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ उद्या जामनेर तालुक्यातील एकूण ३७४७१ बालकांना देणार आरोग्य विभागातर्फे पोलिओ डोस
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्नील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उद्या जामनेर तालुक्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेद्वारे एकाच दिवशी तालुक्यातील ३७४७१ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.यासाठी जामनेर शहरात एकूण २४ बूथ तर ग्रामीण भागात २१५ बूथ ची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यात ७२४ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
तरी सर्व पालकांनी आपल्या शुन्य ते पाच वर्षाच्या बाळाला पोलिओ डोस अवश्य द्यावा.बाळ नुकतेच जन्मलेले असले किंवा यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी उद्या पोलिओ डोस देणे आवश्यक आहे.असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांच्याकडून करण्यात आले आहे.तालुकास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उद्या उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे सकाळी ठीक १० वाजता मा. ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजून करण्यात येणार आहे तरी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा