गुन्हा घडण्यापूर्वीच जामनेर पोलिसांचा प्रहार... ३२ इंची धारदार तलवारीसह आरोपी ताब्यात; धडाकेबाज कामगिरी
जामनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातत्याने प्रभावी कारवाया करणाऱ्या जामनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करत अवैधरित्या धारदार तलवार बाळगून फिरणाऱ्या एका इसमाला रंगेहात ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३२ इंच लांबीची स्टीलच्या पात्याची, समोरून टोकदार मूठ असलेली धारदार तलवार जप्त केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जामनेर शहरातील जुना बोदवड नाका परिसरात एक इसम हातात धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असून तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे.या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात सहाय्यक फौजदार साहिल तडवी, पोलीस अधिकारी प्रताप मथुरे, सचिन महाजन, राजेश लहासे आणि गजानन माळी यांचा समावेश होता. पथकाने तातडीने जुना बोदवड नाका परिसर गाठून संशयिताचा शोध सुरू केला.
दरम्यान, पोलिसांना एक इसम हातात धारदार तलवार घेऊन फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ घेराव घालून ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल विचारपूस केल्यानंतर त्याने आपले नाव भिकन किसन घिसाडी (वय ४२), रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर, ता. जामनेर असे सांगितले.
त्याच्याकडून स्टीलचे पाते असलेली, समोरून टोकदार मूठ असलेली ३२ इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. संबंधित इसमाकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन महाजन यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व सिंघम म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली.कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक फौजदार साहिल तडवी, पोलीस अधिकारी प्रताप मथुरे, सचिन महाजन, राजेश लहासे आणि गजानन माळी यांनी अत्यंत धाडस, सतर्कता आणि तत्परतेने काम करत आरोपीला शिताफीने जेरबंद केले.जामनेर शहरात अवैध शस्त्र बाळगणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे व कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध जामनेर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम यापुढेही कायम राहणार असल्याचे या कारवाईवरून दिसून येत आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

News आज तक ला मागे टाकले आपल्या news चॅनेल ने ग्रेट वर्क
उत्तर द्याहटवा