एचडीएफसी बँक, पाचोरा यांच्या वतीने राजकुंवर महाविद्यालय, बनोटी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी नितीन इंगळे
बनोटी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एचडीएफसी बँक, पाचोरा यांच्या वतीने राजकुंवर महाविद्यालय, बनोटी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेच्या पाचोरा शाखेचे श्री. ज्ञानेश्वर सर, श्री. मनोज पाटील सर, श्री. अशोक काथार सर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. एस. आर. सोळंके, प्रा. जी. पी. चौतमल, प्रा. एस. एन. सोळंके, प्रा. जी. एस. राजपूत, प्रा. व्ही. आर. कऱ्हाळे, प्रा. बी. डी. खैरनार, प्रा. एस. डी. महाले, प्रा. एन. एल. सोळंके, प्राध्यापिका एस. एस. मोहरे, प्रा. बी. व्ही. सोळंके, प्रा. एस. एन. खैरनार प्रा.एस.एन. सोळंके तसेच शिक्षकेतर कर्मचारी अविनाश कोतकर, चेतन वेहळे व ऋतिक कोतकर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.एस्सी.च्या विद्यार्थिनी नेहा हिम्मत आहिरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रथम वर्ष बी.एस्सी.च्या विद्यार्थिनी भाग्यश्री सावता महाजन यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा