राजनी येथील पंकज बोराडे यांची जळगाव पूर्व भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणीत सदस्यपदी नियुक्ती....
जामनेर तालुक्यातील राजनी येथील युवा व अभ्यासू भाजपा कार्यकर्ते पंकज राजेंद्र बोराडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जळगाव पूर्व विभाग कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे राजनी गावासह संपूर्ण जामनेर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भाजप युवा मोर्चाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष संदीप सावळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. पक्ष संघटना अधिक बळकट करणे, युवकांना भाजपच्या विचारधारेशी जोडणे आणि आगामी काळात संघटनात्मक कामाला अधिक गती देणे या उद्देशाने पक्षाने पंकज बोराडे यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
पंकज बोराडे हे पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय राहिले असून सामाजिक बांधिलकी जपत युवकांमध्ये संघटन उभारणीचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या निष्ठावान कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत कार्यकारिणीत स्थान दिले आहे.
या नियुक्तीमुळे जामनेर तालुक्यातील युवा नेतृत्वाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी पंकज बोराडे महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल राजनी गावातील ग्रामस्थ, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंकज बोराडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा