अंत्रोळीत हॅटसन डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू; शेतकऱ्यांना प्रतिलिटर अधिक दराचा लाभ... - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळीत हॅटसन डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू; शेतकऱ्यांना प्रतिलिटर अधिक दराचा लाभ...


समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी, दि. ६ ऑगस्ट : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे हॅटसन दूध संकलन केंद्राचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला दूध उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ व विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक हजारे, जेष्ठ नागरिक गजिनाथ शेजाळ, सरपंच ब्रह्मदेव सलगरे, डॉ. खरात, ग्रामपंचायत सदस्य इन्नुस शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
     यावेळी कांतीलाल बेलदार, ज्ञानेश्वर थोरात, नितीन शिंदे, बिरा थोरात, राहुल कांबळे, राकेश शेजाळ, अप्पू सलगरे, समाधान शिंदे, तानाजी शिंदे, सर्जेराव शिंदे, शिवाजी कोळी, बाबुराव केंगार, तानाजी बेलदार, विपुल सलगरे, कर्णे सलगरे, लक्ष्मण तांदळे, भरत तांदळे, इन्नूस उंबर शेख,  अरूण कांबळे तसेच परिसरातील अनेक दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
     हॅटसन डेअरीचे इंचार्ज प्रवीण पोतदार, रुपेश झाडबुके, डेअरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाजीराव गावडे, डॉ. अमर गौडदाब तसेच चेअरमन ज्योतिबा शिंदे यांनी उपस्थितांना डेअरीच्या विविध योजनांची माहिती दिली.
     यावेळी हॅटसन डेअरीतर्फे दूध उत्पादकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली. गाईच्या दुधाला ३.५ व ८.५ फॅटसाठी प्रतिलिटर ४१.५० रुपये दर दिला जाणार असून, इतर डेअऱ्यांच्या तुलनेत प्रतिलिटर १ ते ३ रुपये अधिक दर मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
     याशिवाय संतोषा पशुखाद्य, संपूर्ण आयुर्वेदिक औषधे, कॅल्शियम, मिनरल मिक्स्चर उपलब्ध करून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांसाठी केवळ ५५ रुपयांत कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
     कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी हॅटसन डेअरीच्या माध्यमातून परिसरातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटन सोहळ्यास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads