महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES शोरूमचे उद्घाटन... - दैनिक शिवस्वराज्य

महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES शोरूमचे उद्घाटन...


समीर शेख प्रतिनिधी 
 सोलापूर : पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक दुचाकींच्या प्रसाराला चालना देणाऱ्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचे उद्घाटन मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
     सोलापूरचे माजी खासदार तथा मार्गदर्शक डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर काळाची गरज असल्याचे सांगत नव्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमास जनसेवक महादेव कोगनुरे, त्यांचे सहपरिवार, नातेवाईक, सागर सिमेंटचे अधिकारी, अतिथी प्युअर व्हेजचे कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर कमी खर्च, अत्यल्प देखभाल आणि प्रदूषणमुक्त प्रवासामुळे इलेक्ट्रिक दुचाकींना नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर YO BYKESच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी महादेव कोगनुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या नव्या व्यवसायात कार्य करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असून, या उपक्रमासाठी विश्वासाने संधी दिल्याबद्दल कंपनीचे तसेच YO BYKESचे सोलापूर जिल्हा वितरक आणि मार्गदर्शक बाळासाहेब मुंदडा यांचे त्यांनी विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम साकार झाला असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असेही त्यांनी सांगितले.
     कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नव्या शोरूमला शुभेच्छा देत लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads