वरणगाव-तळवेलच्या १३ वर्षीय मुलीला न्यायासाठी शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान आक्रमक; भुसावळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
वरणगाव परिसरातील तळवेल येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या गंभीर अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने भुसावळ येथील प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. खानदेश विभाग प्रमुख वर्षाताई तल्लारे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. पोपट आत्माराम पा. पताडे यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तळवेल येथील १३ वर्षीय मुलीसोबत घडलेल्या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पीडित मुलीला शासनाच्या नियमानुसार आवश्यक वैद्यकीय उपचार, समुपदेशन, मानसिक आधार तसेच उपलब्ध असलेले सर्व शासकीय सहाय्य तातडीने मिळवून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने केली.
निवेदन देताना प्रदेश उपसंपर्कप्रमुख श्रीकांत भाऊ पाटील, खानदेश विभाग प्रमुख वर्षाताई तल्लारे, जिल्हाप्रमुख निखिल भाऊ नेमाडे, जिल्हाप्रमुख मनीषाताई पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रिता निळकंठ भंगाळे, पल्लवी पाटील, जयश्री तायडे, मंगला काशिनाथ बोडे, संगीता जेटवे, मनीषा पाटील, शेख कलीम, सपना सुरवाडे, ज्योती इंगळे, कैलास माळी, सुनीता तायडे, नीता भंगाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अल्पवयीन पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा