अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कल्याण केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिन व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न. - दैनिक शिवस्वराज्य

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कल्याण केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिन व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

कल्याण प्रतिनिधी(अशोकराव चव्हाण)- 
अखिल भारतीय स्वराज्य संस्था(AIILSG) या देशातील नामांकीत संस्थेच्या कल्याण विभागीय केंद्रातर्फे १५'अॉगस्ट रोजी ८०'वा स्वातंत्र्य दिवस कल्याण(पूर्व) येथील कडोंमपा वार्ड क्रं.४'जे या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
      या कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य वित्तीय अधिकारी-मा.देवाशीष पंड्या,प्रभागाच्या नगरसेविका-मा.शितलताई मंढारी,विभागीय संचालक-मा.मारुती खोडकेसर,डॉ.पुरुषोत्तमजी टिकेसर,डॉ.विनीत शिंगारेसर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    संस्थेच्या वतीने देशाच्या ८०'व्या स्वातंत्र्य दिन व संस्थेच्या शताब्दी वर्षानिमीत्त भव्य आरोग्य तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.या आरोग्य शिबीराचा केंद्रातील बहुसंख्य विद्यार्थी व प्रभागातील नागरिकांनी यामधे रक्तगट,रक्तदाब,हिमोग्लोबीन,शुगर,बी.एम.आय व शरीरातील रक्ताची पातळी इ.तपासणी करुन आपल्या आरोग्याची माहिती जाणून घेतली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वक्तृत्व आणि गीत गायन करुन कार्यक्रमामधे चांगली रंगत आणली.
      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्राचे कर्मचारी-मा.अनिलजी जाधवसाहेब,मा.संतोषजी पाटिलसाहेब,मा.तानाजी पाटिलसाहेब,मा.अजितजी चव्हाणसाहेब यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन-मा.ओंकार नागरगोजे यांनी तर आभार प्रदर्शन-अमोल सोनवणे यांनी केले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads