स्वातंत्र्य दिनानिमित्त करणी सेनेचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रमचोरवड व खेडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण
भुसावळ:-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने चोरवड व खेडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यामध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पेन, पेन्सिल, वही, पॅड यासह शालेय शिक्षणासाठी आवश्यक असणारे विविध साहित्य देण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष संदिपसिंग राणा, महिला जिल्हाध्यक्ष सारिकाताई राजपूत, जिल्हा सचिव रवीना राजपूत, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, नितीन पाटील, महिला तालुकाध्यक्ष जयश्रीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई राजपूत, चोरवड-खेडीचे लोकनियुक्त सरपंच भैय्या महाजन, गणेश राजपूत, ग्रामपंचायत सदस्य विरेंद्रसिंग पाटील, सागर राजपूत, जिल्हा सचिव चंदू चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चोरवड येथील मुख्याध्यापक सौ. रंजना पाटील, शिक्षिका विजया परदेशी, जितेंद्र पाटील, पंकज चौधरी तसेच खेडी येथील मुख्याध्यापक प्रमोद गांधेले, शिक्षिका गीता राजपूत, पी. पाटील, रमाकांत पिंपळे, कोमलसिंग महाजन, विलास महाजन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रसिंग चौधरी, ईश्वर भोळे, जगनसिंग महाजन आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेडी येथील मुख्याध्यापक प्रमोद गांधेले यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. गीता राजपूत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे करणी सेनेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा