भुसावळात धीरज परदेशी -राजपूत हत्येप्रकरणी संताप... आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करनि सेनेतर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन... - दैनिक शिवस्वराज्य

भुसावळात धीरज परदेशी -राजपूत हत्येप्रकरणी संताप... आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करनि सेनेतर्फे प्रांताधिकार्‍यांना निवेदन...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

स्व धीरज परदेशी -राजपूत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा मिळावी, यासाठी सक्षमपणे खटला चालविण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.

 प्रमुख मागण्या ..
धीरज राजपूत यांच्या हत्येतील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी.हत्येमागील नेमके कारण व आरोपींचा हेतू याबाबत सखोल व निष्पक्ष तपास करावा. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे सन्माननीय उज्वल जी निकम साहेब यांची नियुक्ती करावी प्रकरणाचा जलद तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी.
दोष सिद्ध झाल्यास आरोपींना मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा मिळावी यासाठी सक्षमपणे न्यायालयीन प्रक्रिया राबवावी.
मृताच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सुरक्षा व शासकीय मदत द्यावी.शेवटी, या प्रकरणातील आरोपींवर तातडीने व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, तर सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच या घटनेचा सर्वस्तरीय निषेध नोंदवून, न्याय मिलेपर्यंत लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी तसेच धीरज राजपूत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन देण्यात आले प्रसंगी राष्ट्रीय राजपूत करणे सेनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत प्रदेश सचिव आनंदा पाटील जिल्हाध्यक्ष संदीप राणा जिल्हा उपाध्यक्ष दिवाणसिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष सारिका पाटील जिल्हा सरचिटणीस चंदू चव्हाण, पंकज चौधरी जिल्हा सचिव कविता राजपूत, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील जयश्रीताई पाटील नितीन पाटील तालुका कार्यकारी अध्यक्ष सुरेश पाटील तालुका उपाध्यक्ष श्रद्धा पाटील, तालुका सचिव प्रियंका पाटीलआधी उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads