जामनेरात रिपब्लिकन पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटनकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात रिपब्लिकन पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटनकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन आज सायंकाळी ५ वाजता तहसील कार्यालयाच्या शेजारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याला जामनेर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी रत्नाकर जोहरे, गणेश सपकाळे, शेणफाड सुरवाडे, यादव सुरवाडे, विक्रम बनसोडे, दादाराव मेढे, गोपाल सपकाळे, नितीन सपकाळे, एकनाथ सपकाळे, प्रदीप लोखंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रामदास आठवले यांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळात जामनेर तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads