शेवगा जंगलात बिबट्याचा हल्ला; बैलाचा मृत्यू वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा; शेतकऱ्याचे मोठे नुकसान - दैनिक शिवस्वराज्य

शेवगा जंगलात बिबट्याचा हल्ला; बैलाचा मृत्यू वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

शेवगा पिपरी : शेवगा पिपरी परिसरातील जंगलात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगा पिपरी येथील शेतकरी सनई भाऊ राठोड यांचा बैल नेहमीप्रमाणे २८ ऑगस्ट २०२६ रोजी शेवगा जंगल परिसरात चरण्यासाठी गेला होता. दरम्यान, सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास बिबट्याने बैलावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बैलावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता बैलाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बैलाचा पंचनामा केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी सनई भाऊ राठोड यांचे आर्थिक नुकसान झाले असून, वनविभागाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शेवगा जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच गुरे जंगल परिसरात सोडताना विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads