कॅमेऱ्याच्या पूजनातून फोटोग्राफर्सनी जपला कलेचा सन्मान; जामनेर येथे जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा - दैनिक शिवस्वराज्य

कॅमेऱ्याच्या पूजनातून फोटोग्राफर्सनी जपला कलेचा सन्मान; जामनेर येथे जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
१९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन. या दिनानिमित्त जामनेर शहरातील साई डिजिटल फोटो स्टुडिओ येथे समस्त फोटोग्राफर्सच्या उपस्थितीत कॅमेरा पूजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
फोटोग्राफी ही केवळ छायाचित्र काढण्याची कला नसून, एखादा क्षण, भावना आणि आठवणी कायमस्वरूपी जतन करण्याचे प्रभावी माध्यम आहे. काळानुसार फोटोग्राफी क्षेत्रात मोठे बदल झाले असून डिजिटल तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त कॅमेरा पूजन करून फोटोग्राफी कलेप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
यावेळी सुपडू जाधव, प्रशांत बेलपत्रे, मनोज दुसाने, प्रवीण गावंडे, शशिकांत पाटील, सुनील जाधव, प्रभु झाल्टे, नवल राठोड, विवेक श्रीश्रीमाळ, दिनेश जैन, शशिकांत झाल्टे, राहुल इंगळे, गौरव चौधरी यांच्यासह जामनेर शहरातील फोटोग्राफर्स उपस्थित होते.
यावेळी उपस्थित फोटोग्राफर्सनी एकमेकांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा देत फोटोग्राफी क्षेत्रातील बदल, आधुनिक तंत्रज्ञान आणि या कलेचे महत्त्व याबाबत चर्चा केली. उत्साहपूर्ण वातावरणात कॅमेरा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads