जामनेर–पहूर मार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने 407 वाहन उलटलेदोन ते तीन जण गंभीर जखमी; शासकीय शालेय पोषण आहाराचे साहित्य वाहनात - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर–पहूर मार्गावर भीषण अपघात; टायर फुटल्याने 407 वाहन उलटलेदोन ते तीन जण गंभीर जखमी; शासकीय शालेय पोषण आहाराचे साहित्य वाहनात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
पहूर, ता. जामनेर : जामनेर–पहूर मार्गावर शेंदुर्णी जवळ आज 407 वाहनाचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या अपघातात वाहनातील दोन ते तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अपघातग्रस्त 407 वाहनामध्ये शासकीय शालेय पोषण आहाराचे साहित्य असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

अपघात नेमका कसा घडला, जखमींची ओळख व त्यांची प्रकृती याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads