जामनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!₹२.९४ लाखांचा गांजा जप्त; पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!₹२.९४ लाखांचा गांजा जप्त; पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई


जामनेर : जामनेर पोलिसांनी अवैध गांजा विक्रीविरोधात मोठी कारवाई करत ५ किलो ३५२ ग्रॅम गांजा, किंमत ₹२ लाख ९४ हजार ३६० रुपये, जप्त केला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जामनेर पोलिसांनी जामनेर-भुसावळ रोडवरील सुशिला एजन्सीजवळ, रामा हॉटेल परिसरात कारवाई केली. यावेळी भगवान हिरामण सुशीर (रा. शिंगाईत, ता. जामनेर) याच्याकडून ५ किलो ३५२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी सचिन महाजन, जामनेर पोलीस, तसेच पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 
जामनेर परिसरातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, या कारवाईने अवैध अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads