जामनेर पोलीस निरीक्षक पदी निवृत्ती बोराडे यांची नियुक्ती झाल्याची माहिती - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर पोलीस निरीक्षक पदी निवृत्ती बोराडे यांची नियुक्ती झाल्याची माहिती

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आता पोलीस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे यांच्या खांद्यावर आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय फेरबदलांतर्गत निवृत्ती बो-हाडे यांची जामनेर पोलीस ठाण्याच्या  पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी विविध पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आदेश काढल्याची माहिती आहे. त्यानुसार निवृत्ती बो-हाडे यांच्याकडे जामनेर पोलीस ठाण्याची  जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जामनेर शहरासह ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणे तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुरक्षितता कायम ठेवणे, याकडे आता नव्या प्रभारी निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

निवृत्ती बो-हाडे यांच्या नियुक्तीमुळे जामनेर पोलीस ठाण्याला नवे नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या कार्यपद्धतीकडे जामनेरकरांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads