आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धासाकरीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
साकरी : मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना भुसावळ तालुकाप्रमुख वर्षाताई तलारे यांच्या नेतृत्वाखाली तापी पूर्णा बहुउद्देशीय मागासवर्गीय संस्था (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा, साकरी येथे वृक्षारोपण तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी पूर्णा बहुउद्देशीय मागासवर्गीय संस्थेच्या संस्थापक लीनाताई तलारे तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वलाताई ढाके होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीतावर नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख सविताताई माळी, उपजिल्हा संघटक मनीषाताई पाटील, तालुकाप्रमुख रेखाताई देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या बिनाताई लाल, हमिदाबाई अन्सारी, महेशकुमार महाजन, शिक्षिका ज्योत्स्ना कचरे, सूर्यकांत कडू घुले, एजाज देशमुख यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
चित्रकला स्पर्धेनंतर शाळेच्या प्रांगणात उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांना ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे लीनाताई तलारे यांनी आभार मानले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा