श्री.गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; १०९ रक्तदात्यांचे योगदानशास्त्रीनगरातील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; भक्तीबरोबरच समाजसेवेचा आदर्श - दैनिक शिवस्वराज्य

श्री.गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; १०९ रक्तदात्यांचे योगदानशास्त्रीनगरातील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; भक्तीबरोबरच समाजसेवेचा आदर्श

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जामनेर शहरातील शास्त्रीनगर परिसरात गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या चौथ्या वर्षात तब्बल १०९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम राबविले जातात. याच सामाजिक भावनेतून यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेडप्लस ब्लड सेंटर फाउंडेशन यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले.
‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, भक्त, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या शिबिरात १०९ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
या वेळी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, एकनाथ मिस्तरी, संजय महाजन, राहुल भाऊ चव्हाण, विकास पाटील, ईश्वर प्रल्हाद चवरे, शंकर सातवे, भैय्या परिट, माधव चव्हाण, कैलास पालवे, नाना सातवे, महेंद्र बाविस्कर (मा. उपनगराध्यक्ष), दिलीप खोडपे सर (मा. जिल्हा परिषद सदस्य), बाबुराव हिवराळे (नगरसेवक), चंद्रकांत शिंदे (नगरसेवक), पप्पू भाऊ पाटील, सचिन बोरसे, ईश्वर पवार, प्रदीप गायके, रविंद्र बंडे, नामदेव पालवे, डॉ. विनोद भोई, जगदीश बैरागी, संतोष सोनवणे, संजय पालवे, गोकुळ साळुंके, युवराज माळी, जयवंत पर्वते, विकास माळी, आकाश साळुंखे यांच्यासह गजानन महाराज भक्त परिवारातील कार्यकर्ते, नागरिक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने सातत्याने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. भक्तीला समाजसेवेची जोड देत सेवाभावी परंपरा पुढे नेण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गजानन महाराजांच्या पुण्यतिथीला सामाजिक सेवेचे स्वरूप देण्यात आले असून, १०९ रक्तदात्यांनी दिलेले रक्तदान हे अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads