उत्कृष्ट अभियंता गौरव पुरस्काराने विनोद पाटील यांचा सन्मान!हिवरखेडे बुद्रुकच्या सुपुत्राच्या कर्तृत्वाचा गौरव; जामनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामनेर तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक येथील सुपुत्र तथा गिरणा पाटबंधारे विभाग, जळगावचे कार्यकारी अभियंता श्री. विनोद प्रकाश पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि कार्यकुशलतेची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट अभियंता गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.अभियांत्रिकी क्षेत्रात जबाबदारीने कार्य करताना विभागाच्या कामकाजाला प्रभावी दिशा देणे, विविध विकासकामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे तसेच आपल्या कार्यातून विश्वास निर्माण केल्याबद्दल श्री. पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि कार्यनिष्ठेच्या जोरावर मिळविलेला हा सन्मान हिवरखेडे बुद्रुक गावासह संपूर्ण जामनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे हिवरखेडे बुद्रुकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्री. विनोद पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दाखविलेली कार्यकुशलता, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ‘उत्कृष्ट अभियंता गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.श्री. विनोद प्रकाश पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा