दिव्यांगांच्या थकीत अनुदानासाठी तहसील कार्यालयावर धडक!तहसीलदार आगळे यांचे आश्वासन; आठ दिवसांत प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा शब्द
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर : तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे थकीत अनुदान त्वरित मिळावे तसेच प्रलंबित KYC व पोर्टलशी संबंधित अडचणी दूर करून कोणत्याही दिव्यांगाचे अनुदान थांबू नये, या मागणीसाठी आज शेकडो दिव्यांग बांधवांनी जामनेर तहसील कार्यालय गाठले.
यावेळी विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, जामनेर यांच्या पुढाकाराने तहसीलदार नानासाहेब आगळे तसेच संजय गांधी निराधार शाखेच्या शिवदे मॅडम यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विशेषतः KYC पूर्ण न झाल्याने किंवा पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेले अनुदान तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
दिव्यांग बांधवांच्या अडचणी जाणून घेत तहसीलदार आगळे यांनी “येत्या आठ दिवसांत दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर कार्यवाही करून त्यांना न्याय देण्यात येईल. कोणाचेही अनुदान थांबणार नाही,” असे आश्वासन दिले.
या वेळी विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, जामनेरचे अध्यक्ष पवन भाऊ माळी, रविभाऊ झाल्टे, गणेश साळुंखे, महाले, अंबिका टहाकडे, कडूबा साबळे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आठ दिवसांत होते का, याकडे आता तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा