महाराष्ट्र
अंत्रोळी येथे पीर महिबूब सुबानी उरूसनिमित्त रक्तदान शिबिर... ६५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक बांधिलकीचा आदर्श
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : ग्रामदैवत पीर महिबूब सुबानी यांच्या उरूसनिमित्त अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे पीर महिबूब सुबानी उरूस कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान हेच जीवनदान’ या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यास हातभार लागावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सामाजिक सेवेचा संदेश दिला.
‘आपले रक्त, कोणाचेतरी जीवन’ या भावनेतून झालेल्या या उपक्रमामुळे अंत्रोळी परिसरात सामाजिक एकतेचे दर्शन घडले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे योगदान गरजू रुग्णासाठी आशेचा किरण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पीर महिबूब सुबानी उरूस कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी ६५ रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच शिबिराच्या आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, नागरिक व सिध्देश्वर ब्लड सेंटर च्या सर्व सहकाऱ्यांचेही कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा