जामनेर पोलिसांची धडक कारवाई...गारखेडा, शहापूर, सामरोद परिसरात ५ ठिकाणी छापे; ₹८७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त
जामनेर : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जामनेर पोलिसांनी अवैध गावठी दारू निर्मितीविरोधात धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. १७ व १८ सप्टेंबर २०२६ रोजी गारखेडा, शहापूर आणि सामरोद परिसरात एकूण ५ ठिकाणी छापे टाकले.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹८७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे १,६०० लिटर गावठी दारू गाळण्यासाठी उपयोगी गूळ व नवसागर मिश्रित कच्चे रसायन/आंबट द्रव, तसेच ४५ लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जामनेर पोलिसांनी जारी केलेल्या प्रोव्हिबीशन प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आली आहे.
५ आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल
या कारवाईप्रकरणी ५ आरोपींविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सण-उत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता कायम ठेवण्यासाठी जामनेर पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईची मोहीम सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आगामी काळातही अवैध दारू निर्मिती, विक्री आणि इतर गैरप्रकारांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा