संघर्षातून आई-वडिलांचे स्वप्न साकार करणाऱ्या कन्येचा समाजाला अभिमान!— प्रा. डी. एस. पाटील - दैनिक शिवस्वराज्य

संघर्षातून आई-वडिलांचे स्वप्न साकार करणाऱ्या कन्येचा समाजाला अभिमान!— प्रा. डी. एस. पाटील

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

दि. 19 सप्टेंबर २०२६ आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळविणे सोपे राहिलेले नाही. एका-एका गुणासाठी विद्यार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांकडून काही ना काही स्वप्न पाहिलेले असते. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संघर्षातून यश संपादन करणाऱ्या मुलांचा सार्थ अभिमान आई-वडिलांसह संपूर्ण समाजाला वाटतो. असेच कौतुकास्पद कार्य फत्तेपूर येथील राजपूत समाजाच्या कन्येने करून दाखविले आहे. तिने शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले असून, भविष्यात ती उच्च पदावर विराजमान होऊन समाजाला यापेक्षाही मोठा आनंद देईल, असा विश्वास केशरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डी. एस. पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत जिल्हा परिषद तसेच इतर शाळांमधील शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MAHATET/TAIT) परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिक्षक पदासाठीची पवित्र पोर्टल प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.

या भरती प्रक्रियेत फत्तेपूर येथील दैनिक देशदूतचे पत्रकार अभयसिंग राजपूत यांची कन्या कु. शिवानी अभयसिंग पाटील हिची ठाणे जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल जामनेर येथील महाराणा उत्सव समिती व केशरिया प्रतिष्ठान यांच्या वतीने फत्तेपूर येथे कु. शिवानी पाटील हिच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रा. डी. एस. पाटील बोलत होते.

याप्रसंगी जामनेर येथील महाराणा उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत सिसोदिया यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. जामनेर तालुक्यातील राजपूत समाजातील जे विद्यार्थी यशाचे शिखर गाठतात, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराणा उत्सव समिती व केशरिया प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला जातो. या उपक्रमामुळे राजपूत समाजातील विद्यार्थ्यांना बळ व प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले.

या छोटेखानी कार्यक्रमात कु. शिवानी पाटील, तिची आई सौ. कल्पना अभयसिंग पाटील आणि वडील पत्रकार अभयसिंग राजपूत यांचा केशरिया प्रतिष्ठान व महाराणा उत्सव समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी समाजाच्या वतीने तसेच माऊली ॲक्वाचे संचालक मुकेश राजपूत व संतोष राजपूत यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. तसेच विमल हॉस्पिटलचे डॉ. सुरजसिंग पाटील व डॉ. स्नेहा पाटील यांनी कु. शिवानी पाटील हिचा सत्कार करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माजी महिला सरपंच सौ. सीमा पंकज चोपडे व पंकज चोपडे यांनीही कु. शिवानीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला महाराणा उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत सिसोदिया, केशरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डी. एस. पाटील, मोयगावचे माजी सरपंच प्रा. महेंद्रसिंग कच्छवाह, उत्सव समितीचे सदस्य रमेशसिंग पाटील, प्रकाश पाटील (टेलर), फत्तेपूरचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण पाटील, भरतसिंग बोराडे, गुलाब पाटील, माजी उपसरपंच ईश्वरसिंग पाटील, माणिकराव पाटील, सुभाष पाटील, समाधान राजपूत, युवराज पाटील, दीपक राजपूत, सरदारसिंग पाटील, संतोष पाटील, सोनूसिंग राजपूत, भगवान राजपूत, संतोष लहेनसिंग पाटील, राजेंद्र पाटील, मुकेश पाटील, शुभम राजपूत, राहुल राजपूत, निखिल राजपूत, गोपाल राजपूत, हितेंद्र राजपूत, शंतनु राजपूत, गणेश राजपूत, अनिकेत राजपूत, हरिओम राजपूत, सोहम राजपूत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी कु. शिवानी पाटील हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आई-वडिलांच्या स्वप्नांना साकार करत शिक्षण क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे फत्तेपूरसह संपूर्ण राजपूत समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads