समाजसेवक आबासाहेब पाटील यांना राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार’!सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कृषी, सहकारासह विविध क्षेत्रातील निस्वार्थ कार्याची दखल
समाजहिताला प्राधान्य देत कोणत्याही पदाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता रात्रंदिवस निस्वार्थ भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबविणारे समाजसेवक आबासाहेब पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथील प. सा. नाट्यगृहात जाणीव सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर साहेब, मा. शिवाजी राजे जाधव तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत आबासाहेब पाटील यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक व निस्वार्थी उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजक मा. जगन्नाथ पाटील यांनी यावेळी सांगितले.
विविध सामाजिक उपक्रमांत सातत्यपूर्ण योगदान
आबासाहेब पाटील यांनी समाजातील विविध घटकांसाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. यामध्ये वधू-वर मेळावे, शिवजयंती महोत्सव, कोरोना लसीकरण महाशिबिराचे आयोजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप यांचा समावेश आहे.
तसेच बेरोजगार युवकांना उद्योग उभारण्यासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करणे, सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथींचे आयोजन, सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी काही आगळे-वेगळे प्रोत्साहनपर उपक्रमही राबविले आहेत. लग्न वेळेवर लावल्यास ५ हजार रुपये बक्षीस तसेच दोन मुली झाल्यानंतर ५ हजार रुपये बक्षीस देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे.
वृक्षारोपणाची सुरुवात स्वतःच्या बांधापासून
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना आबासाहेब पाटील यांनी केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या बांधापासून वृक्षारोपणाची सुरुवात केली. समाजातील इतरांनीही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, हा संदेश त्यांच्या या उपक्रमातून देण्यात आला.
विविध क्षेत्रांत कार्याचा ठसा
क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, सहकार, सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि कृषी अशा समाजजीवनातील विविध क्षेत्रांत आबासाहेब पाटील यांनी योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती मोठी असून, विविध स्तरातील नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे.
अनेक सामाजिक संस्थांशी सक्रिय संबंध
आबासाहेब पाटील हे विविध सामाजिक संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांची कार्यरत पदे पुढीलप्रमाणे आहेत—
१) आबासाहेब पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष
२) अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जामनेरचे उपाध्यक्ष
३) उद्योजक कक्ष, जळगावचे माजी जिल्हाध्यक्ष
४) गुजरात राज्य प्रदेशाध्यक्ष – सहकार कक्ष
५) मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष – वसतिगृह कक्ष
६) राष्ट्रीय समन्वयक – वधू-वर कक्ष
याशिवाय ते विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांशी जोडलेले असून, समाजहिताच्या कार्यात सातत्याने योगदान देत आहेत.
४० हून अधिक पुरस्कारांनी गौरव
आबासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आतापर्यंत त्यांना ४० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजासाठी सातत्याने कार्य करण्याची त्यांची भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
जामनेर तालुक्यातील कुंभारीसीम हे त्यांचे मुळगाव असून, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कार’ मिळाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याला आणखी एक मानाची पावती मिळाली आहे.
समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने धावून जाणाऱ्या, सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या आबासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याला मानाचा मुजरा
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा