जामनेर येथे तेली समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न५० गुणवंत विद्यार्थ्यांसह कला, क्रीडा व शासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा गौरव - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर येथे तेली समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न५० गुणवंत विद्यार्थ्यांसह कला, क्रीडा व शासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा गौरव

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर : तेली समाज पंच मंडळ, जामनेर यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृह, हिवरखेडा रोड, जामनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ५० विद्यार्थ्यांसह कला, क्रीडा तसेच शासकीय नोकरी प्राप्त केलेल्या समाजबांधवांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सौ. साधनाताई गिरीष महाजन (लोकनियुक्त नगराध्यक्षा, जामनेर), उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत अण्णा बाविस्कर, जा. ता. ए. सो.चे सचिव श्री. जितेंद्र काका पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विजय भाऊ चौधरी होते.

यावेळी जळगाव येथून महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रय चौधरी व सचिव श्री. अनिल पाटील सर यांच्यासह जामनेर तालुक्यातील विविध गावांचे समाज अध्यक्ष तसेच जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन

गुणगौरव सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाल व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कोमल नाना चौधरी, सहाय्यक प्राध्यापिका, शासकीय दंत महाविद्यालय, जळगाव तसेच डॉ. प्रथमेश निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. विजय भाऊ चौधरी यांनी समाज संघटन, सामाजिक एकजूट आणि विविध सामाजिक विषयांवर समाजबांधवांशी संवाद साधला. समाजातील युवक-युवतींनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत प्रगती करावी, यासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

आयोजकांचे विशेष परिश्रम

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विक्रम चौधरी सर यांनी केले.

हा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी तेली समाज पंच मंडळ जामनेरचे अध्यक्ष श्री. सोपान चौधरी, उपाध्यक्ष श्री. निखिल भोलाने, सचिव श्री. रामेश्वर पाटील, श्री. सुरेश तेली सर, श्री. पप्पू चौधरी, श्री. मुकेश चौधरी, श्री. किरण चौधरी यांच्यासह सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

शैक्षणिक, कला, क्रीडा आणि शासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान करून त्यांच्या यशाला प्रोत्साहन देणारा हा सोहळा समाजातील विद्यार्थी व युवकांसाठी प्रेरणादायी ठरला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads