जामनेरचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्तीबोऱ्हाडेयांचा फाउंडेशन ग्रुपतर्फे सत्कार
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर : जामनेर तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी फाउंडेशन ग्रुपचे फिरोज सैयद, शाहबाज खान, असलम भांजा, तौसीफ शेख, शाहिद शेख, शोएब शेख यांच्यासह ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी जामनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुक्यात पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.
फाउंडेशन ग्रुपच्या या सदिच्छा भेटीमुळे पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील समन्वयाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा