महिलांसाठी मोफत रक्त तपासणी व शरीर रचना मूल्यांकन शिबिर उत्साहात संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

महिलांसाठी मोफत रक्त तपासणी व शरीर रचना मूल्यांकन शिबिर उत्साहात संपन्न



जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच कासट हॉस्पिटल व वेथ फार्मा (Wyeth Pharma) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी महिलांसाठी मोफत रक्त तपासणी व शरीर रचना मूल्यांकन (Body Composition Assessment - BCA) शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हे शिबिर कासट हॉस्पिटल, पाचोरा रोड, जामनेर येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आले. महिलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना शरीरातील विविध घटकांविषयी माहिती मिळावी, तसेच आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

“Together, let's Nourish to Flourish — Iron Up Camp” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात महिलांची मोफत रक्त तपासणी तसेच शरीर रचना मूल्यांकन करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवस्वराज्य महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जामनेर तालुका अध्यक्षा ज्योतीताई इंगळे तसेच सचिव सपना ताई सुरवाडे यांनी विशेष पुढाकार घेतला.

महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला

तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निर्धार महामोर्चा

शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित निर्धार महामोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
माननीय श्रीकांत भाऊ पाटील शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यावेळी संघटनेच्या वतीने आपली भूमिका मांडताना
 जामनेर तालुका महिला आघाडी अध्यक्ष – ज्योतीताई इंगळे
 जळगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष – शोभाताई मोते
सपना ताई माळी यांनी उपस्थितांना संबोधित करून आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ संघटनेची भूमिका स्पष्ट केली.

शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
समाजहितासाठी सदैव तत्पर


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads