शेंदुर्णी येथील २१ वर्षीय मिथिलेश पाटील बेपत्ता२१ सप्टेंबरपासून शोध सुरू; जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याची माहिती - दैनिक शिवस्वराज्य

शेंदुर्णी येथील २१ वर्षीय मिथिलेश पाटील बेपत्ता२१ सप्टेंबरपासून शोध सुरू; जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याची माहिती

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील मिथिलेश महेश पाटील (वय २१ वर्षे) हा तरुण २१ सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०२४६/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप मिथिलेशचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता मिथिलेश शेंदुर्णी येथून निघाला. तो शेंदुर्णीहून जळगाव येथे गेल्यानंतर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या शिवशाही/एसटी बसने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

मिथिलेश बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला. परिसरात चौकशी करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी पहूर पोलिसांना माहिती देण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेचे ठिकाण शेंदुर्णी, ता. जामनेर असून ते पहूर पोलीस ठाण्यापासून पश्चिम दिशेला सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे.

मिथिलेशच्या शोधासाठी आई-वडील, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. पहूर पोलिसांकडूनही उपलब्ध माहितीच्या आधारे त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नागरिकांना आवाहन

मिथिलेश महेश पाटील हा कुणाला आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पहूर पोलिसांशी किंवा त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पहूर पोलीस ठाणे : ९०२१६९०५३१
वडील महेश पाटील : ९४२१५६७६३८

मिथिलेशच्या शोधासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिस व कुटुंबीयांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads